28 November 2020

News Flash

पतीचा गळा दाबून खून

शहरातील सिंघानिया नगरातील एका व्यक्तीचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुध्द

| April 27, 2013 02:57 am

शहरातील सिंघानिया नगरातील एका व्यक्तीचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सुरेश श्रीराम पारसकर (३०, रा. सिंघानियानगर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून पत्नी कमल पारसकर हिने ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पती सुरेश याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी सुरेशला मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयातच मृताच्या नातेवाईकांनी कमल हिला मारहाण केली होती. यावेळी रुग्णालयातील रुग्णचालकांनी तिला वाचविले होते. यावेळी शवविच्छेदन करतांना मृताच्या  मानेवर काळा चट्टा उमटला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, आज, शवविच्छेदन अहवाल वडगाव रोड पोलिसांना प्राप्त झाला. यात गळा दाबल्याने सुरेशचा मृत्यू झाल्याचे, तसेच गजानन श्रीराम पारसकर (३२, रा. एमआयडीसी लोहारा) याने वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हा खून त्यांची पत्नी कमल पारसकर हिने केल्याचे नमूद केले. त्यावरून वडगाव रोड पोलिसांनी आरोपी कमल पारसकरविरुध्द गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिक तपास ठाणेदार विपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:57 am

Web Title: husband murdered by strangulate
Next Stories
1 ‘सेव्ह सुभाष गार्डन’ च्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा
2 महाकाली यात्रेकरूंचा पाणीटंचाईशी सामना
3 ऐन भरात येऊनही ‘केळीचे सुकले बाग’..
Just Now!
X