तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विखे गटाच्या जनसेवा मंडळाचा दारुण पराभव करत स्पष्ट बहुमतासह सत्ता हस्तगत केली.
या निवडणुकीत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जनसेवा मंडळ, राष्ट्रवादीचे नेते शंकरराव कोल्हे यांची विकास आघाडी, शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांचे लोकसेवा मंडळ व भाजपप्रणित प्रगती मंडळ अशी चौरंगी लढत झाली. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. कोल्हे गटाला १२, विखे गटाला २ आणि आमदार काळे गटाला ३ जागा मिळाल्या. भाजपप्रणित प्रगती मंडळाला खातेही उघडता आले नाही.
राहाता तालुक्यातील ही मोठी ग्रामपंचायत मंत्री विखे व आमदार काळे यांच्या गटाच्या ताब्यात होती. राष्ट्रवादीने या दोघांवर मात करुन सत्तांतर घडवून आणले. सरपंच मुरलीधर थोरात यांच्यासह पाच विद्यमान सदस्यांना पराभव पत्कारावा लागला. राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- शकुंतला धनवटे, संतोष गगे, सुनिता मोरे, पुष्पा जाधव, अभय धनवटे, छाया जोगदंड, प्रशांत वाघ, विजय वहाडणे, ज्योती िशदे, बलराज धनवटे, कल्पना पगारे, अनिता िशदे. काळे गट- निर्मला बाबरे, अनिता थोरात, स्मिता कुलकर्णी आणि विखे गट- साहेबराव बनकर, उपसरपंच वंदना धनवटे.
तालुक्यातील कणकुरी ग्रामपंचायतीतही विखे गटाचा सपशेल पराभव झाला. त्यांना एकही जागा मिळाली नाही. सर्व म्हणजे सातही बाबासाहेब डांगे गटाने जिंकल्या. रुई ग्रामपंचायतीत मात्र विखे समर्थकाने सत्ता मिळवली. विखे समर्थक रावसाहेब देशमुख, भाऊराव शिरसाठ यांनी ही सत्ता कायम राखली.