‘शब्द ऋणांचे फेडाया’
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. वासुदेव बेडेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘सत्कर्म प्रतिष्ठान’ तर्फे रविवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ठाणे महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात ‘शब्द ऋणांचे फेडाया’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अंगद म्हसकर आणि अनन्या म्हसकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी विविध कवींच्या कविता आणि गाणी ते सादर करतील.
‘पत्रकार आणि मराठी साहित्य’
ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे शनिवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता संस्थेच्या ठाण्यातील टेंभीनाका येथील कै. वा. अ. रेगे सभागृहात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे ‘पत्रकार आणि मराठी साहित्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘नाटय़ालंकार’चे आयोजन
गुढीपाडव्यानिमित्त अंबरनाथ संगीत सभेच्या वतीने शनिवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता ब्राह्मणसभा सभागृह, वडवली, अंबरनाथ (पू) येथे ‘नाटय़ालंकार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटय़संगीताचे वादन तसेच गायन यावेळी सादर केले जाणार आहे. गायक कलाकार आनंदा कुलकर्णी आणि अपर्णा हेगडे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी तबल्यावर प.धनंजय पुराणिक, आर्गनवर पं. मकरंद कुंडले, व्हायोलिनवर पं.राजेंद्र भावे साथ करतील. सूत्रसंचालन श्रीराम केळकर करतील.
‘गा मेरे मन गा’
ठाण्यातील ‘लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थे’च्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने रविवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळेत सनक्रेस्ट गुहसंकुल, इमारत क्रमांक – ७ जवळील मैदान, ग्रीनरोड लुईसवाडी, ठाणे येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘गा मेरे मन गा’ हा सांगितीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध नाटककार शशिकांत कोनकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्रीधर फडके यांचे ‘गीत रामायण’
रामनवमी निमित्त ‘विराट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच’ तर्फे रविवार १४ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे ‘गीतरामायणाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके आपल्या वादक कलाकारांसह हा कार्यक्रम सादर करणार आहेत. अधिकाधिक नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दत्ताजी ताम्हणे यांचा सत्कार
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे येत्या १३ एप्रिल रोजी १०० वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्त रविवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील खारकर आळी येथील सी. के. पी. हॉलमध्ये आयोजित भव्यक कार्यक्रमात दत्ताजी ताम्हणे यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी लेखक चांगदेव काळे लिखित ‘शतकयोगी’ या चरित्राचे प्रकाशन केले जाणार आहे. स्वातंत्र्यसेनानी डॉ. शांती पटेल, मेजर सुभाष गावंड आणि किशोर बेडकीहाळ यांच्यासह ठाण्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. अ‍ॅड्. सूर्यकांत वढावकर कामगार सेवा ट्रस्ट, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सोशल क्लब आणि व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक संख्येन यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.