शहरातील बी. पी. आर्टस्, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयात संगणक विभागातर्फे आयटी दिंडी काढली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. जी. पी. वाणी, संगणक विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. मिलींद बिल्दीकर, उपप्राचार्य प्रा. दादासाहेब भाटेवाल, संचालक प्रा. साहेबराव घोडे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वाणी यांनी प्रास्तविक केले.
संगणक शिक्षण काळाची गरज झाली असून सलग सहा वर्षांपासून संगणक विभागातर्फे आयटी दिंडी काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. बिल्दीकर यांनी संगणक ‘फोबिया’ जर आपण घालवू शकलो तर अधिक आत्मविश्वासाने आपण संगणकीय शिक्षण अमलात आणू शकू. संगणकाची आवड असलेले विद्यार्थी आपण या आयटी दिंडीच्या माध्यमातून तयार करतो, असे त्यांनी नमूद केले.