लेखक डिगांबर सवडतकर लिखित ‘दुरावलेली माणसं’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी व मान्यवरांच्या हस्ते या कादंबरीचे थाटात प्रकाशन करण्यात आले आहे.
सवडतकर हे विट्ठल-रुख्माई विद्यालय शेलगाव देशमुख येथे अध्यापक आहेत. या आधी सुध्दा त्यांच्या ‘ज्वाला’ ही एड्सवर आधारित व वर्तमानातील सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकणारी ही साहित्य कृती प्रकाशित झालेल्या आहेत. ‘दुरावलेली माणसं’ या कादंबरीतून त्यांनी आधुनिक जगात आपल्या मुलांकडून आईवडिलांना दुर्लक्षित केल्या जात असून ज्यांनी मुलांसाठी खस्ता खाल्या त्यांना परिस्थितीचे चटके सहन करून जगावे लागत आहे, असा आशय मांडला आहे.