News Flash

तरुणाचा खून करून मृतदेह पाझर तलावात टाकला?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे रेल्वे रुळालगत एका तरुणाचा खून करून मृतदेह टाकून देण्याचा प्रकार अद्याप ताजा असतानाच याच तालुक्यातील मुस्ती येथे पाझर तलावात एका

| July 10, 2013 01:58 am

तरुणाचा खून करून मृतदेह पाझर तलावात टाकला?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे रेल्वे रुळालगत एका तरुणाचा खून करून मृतदेह टाकून देण्याचा प्रकार अद्याप ताजा असतानाच याच तालुक्यातील मुस्ती येथे पाझर तलावात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हादेखील खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मृताचे वय २७ वर्षांचे असून त्याची ओळख पटली नाही. त्याच्या डोक्यावर हत्याराने प्रहार करून खून करण्यात आल्याचा कयास असून, खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह मुस्ती येथे पाझर तलावात आणून टाकण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मारेकरी कोण व खून कशासाठी केला, याचा शोध वळसंग पोलीस घेत आहेत.
सहाआसनी रिक्षाचा अपघात
अक्कलकोट येथे सहा आसनी रिक्षा पालथी होऊन घडलेल्या अपघातात महेश सुरेश बनसोडे हा अक्कलकोटचा तरुण मरण पावला, तर रिक्षाचालक सिद्धार्थ भीमराव बनसोडे याच्यासह सहा प्रवासी जखमी झाले. प्रवासी घेऊन सहा आसनी रिक्षा निघाली असता वाटेत भरधाव रिक्षा पालथी झाली. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:58 am

Web Title: murder of youth dead body thrown in oozing lake
टॅग : Dead Body
Next Stories
1 उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच
2 अवाजवी करवसुलीच्या विरोधात पारगमन कर नाक्यावर तोडफोड
3 टोलप्रश्नी चर्चेतून तोडगा – मुख्यमंत्री
Just Now!
X