तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गटाला जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादीला सात, काँग्रेसला तीन, तर माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या गटाला एका ग्रामपंचायतीत यश मिळाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांच्या गुजरवाडी ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व सात जागा काँग्रेसला मिळाल्या. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी ग्रामीण भागातील लक्ष काढून घेतले, तर आमदार कांबळे यांचा कार्यकर्त्यांशी अद्याप सूर जुळलेले नसल्याने काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत आपटी बसली. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या गावांतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पूर्वी ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती पुन्हा मिळवताना दमछाक झाली.
उक्कलगाव ग्रामपंचायतीवर माजी सभापती इंद्रनाथ थोरात व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांची पकड कायम राहिली. राष्ट्रवादीला पंधरापैकी चौदा जागा मिळाल्या. माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या काँग्रेसचा तेथे धुव्वा उडाला. निवडणुकीत विकास थोरात, प्रकाश जगधने, रिवद्र जगधने हे प्रमुख उमेदवारजिंकले. निमगाव खैरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला आठ, तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. काँग्रेसचे विलास शेजूळ पराभूत झाले. राष्ट्रवादीचे शिवाजी शेजूळ, आदिनाथ झुराळे, लहानू शेजूळ, सुंदरभान भागडे, तर काँग्रेसचे विद्यमान सरपंच तुकाराम काजळे उमेदवार विजयी झाले.
शिरसगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायत त्यांनी खेचून आणली. येथे राष्ट्रवादीला नऊ, तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या. भोकर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला दहा, तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. या पंचायतीत सत्तांतर झाले. भैरवनाथनगरला राष्ट्रवादीला सात, तर काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या दीपाली फरगडे, परिघाबाई लबडे, वसंत देवकर हे तर काँग्रेसचे दिगंबर फरगडे व सुनीता महेंद्र गायकवाड हे विजयी झाले. खिर्डी ग्रामपंचायतीत मुरकुटे गटाला दणदणीत यश मिळाले.
दत्तनगरला काँग्रेसला चौदा, तर राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली. काँग्रेसचे पी. एस. निकम हे तर राष्ट्रवादीचे हिरामण जाधव, अशोक लोंढे पराभूत झाले. निवडणुकीत काँग्रेसचे आम्रपाली दिघे, प्रेमचंद कुंकुलोळ, सुनील शिरसाठ हे प्रमुख उमेदवारजिंकले. राष्ट्रवादीचे अरुण वाघमारे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. माळवाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नितीन आसने यांनी आपली सत्ता कायम राखली. तेथे काँग्रेसला सहा, तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. काँग्रेसचे डॉ. आसने व बाळासाहेब आसनेजिंकले. येथे सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेकरिता राखीव असून, या जागेवरून राष्ट्रवादीच्या आसराबाई भाऊसाहेब चिडे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सत्ता येऊनही सरपंचपद गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी आपल्या गुजरवाडी गावात सर्वच्या सर्व जागा काँग्रेसलाजिंकून दिल्या. सर्व जागा एकाच गटाला मिळण्याचा पंचायत निवडणुकीतील हा विक्रम आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त केल्या. निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान सरपंच अमोल गुजर, रामचंद्र गुजर, रोहिणी गुरसळ, पांडुरंग खेमनर हे उमेदवार विजयी झाले. फत्याबाद पंचायत निवडणुकीत माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या दोन गटांत लढत झाली. तेथे विखे समर्थक जिंकले. विजयी उमेदवारांत नासिर पटेल, नंदा कुहिले, सुरेश चांडे, वृषाली आठरे या उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे यांनी मतमोजणीची चोख व्यवस्था ठेवली.
पती पराभूत; पत्नी विजयी
भैरवनाथ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे बापूसाहेब लबडे हे पराभूत झाले. मात्र त्यांच्या पत्नी परिघाबाई या दुसऱ्या प्रभागातूनजिंकल्या. अशोक कारखान्याचे संस्थापक भास्करराव गलांडे यांचे नातू विरेश हे उंदीरगावातूनजिंकले, तर दुसरे नातू सौरभ गवारे हे भैरवनाथनगरमधून पराभूत झाले. खैरीनिमगावमधून शिवाजी शेजूळ हे राष्ट्रवादीकडूनजिंकले. त्यांचे बंधू विलास शेजूळ काँग्रेसकडून दुसऱ्या प्रभागातून उभे होते ते पराभूत झाले.