03 December 2020

News Flash

अफजल गुरूच्या फाशीचे सरकारने राजकारण करू नये- राज ठाकरे

संसद हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीचे सरकारने व इतरांनी राजकारण करू नये. अफजल गुरूला फाशी झाली हे योग्यच झाले. परंतु सरकारने असे निर्णय घेताना

| February 10, 2013 09:31 am

संसद हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीचे सरकारने व इतरांनी राजकारण करू नये. अफजल गुरूला फाशी झाली हे योग्यच झाले. परंतु सरकारने असे निर्णय घेताना वेळ लावता कामा नये, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सातारा येथे व्यक्त केले.
राज ठाकरे आज सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी ते  पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले की, देशात सध्या अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. त्यावरून लक्ष  दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार फाशीचे राजकारण करत आहे. लवकरच ७ ते ८ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकारण सोडून राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.
दुष्काळी भागात मी जाण्यापेक्षा तेथे चारा-पाणी-धान्य पोहोचण्याची गरज आहे आणि या भागात दुष्काळ काय आत्ताच पडलाय काय. माझ्या जाण्याआधीच तेथे हे सर्व पोहोचले आहे. दरवर्षी दुष्काळाचे राजकारण करणारे सत्तेत कसे जातात. निवडून कसे येतात. त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार काय, या विषयावर त्यांनी बोलणे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 9:31 am

Web Title: no politics on afzal guru hanging raj thakre
Next Stories
1 मोबाईल शॉपी फोडून १२ लाखांची चोरी
2 शाहू स्मारक भवनात चित्रपट महोत्सवाचे आयोजन
3 राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर
Just Now!
X