News Flash

बीडमध्ये ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन

बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर होत्या.

| August 12, 2013 01:50 am

बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर होत्या. या वेळी नगरपालिका गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, यशवंतराव इर्लेकर, अॅड. मधुकर गोडसे, भरत लोळगे, विलास विधाते आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाल्या, आपले शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर असून येथे अनेक दिग्गज कलावंतांनी आपापली कारकीर्द गाजवली आहे. काळाच्या महिम्यात ते मागे पडल्याची जाणीव त्यांना होऊ नये म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ मंडळी घरातील टाकाऊ वस्तू नसून त्यांच्यामुळे घराला घरपण येते, ही जाणीव त्यांच्या मुलाबाळांमध्ये निर्माण व्हावी, हा कार्यक्रमाचा हेतू आहे. मुद्दामहून हा आगळावेगळा कार्यक्रम ज्येष्ठ कलावंत व वडीलधारी नाटय़कला मंडळी यांच्यासाठी आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:50 am

Web Title: one evening sinior citizen programme arranging in beed
टॅग : Beed
Next Stories
1 तहसीलदारांवर ट्रॅक्टर घातला!
2 खड्डय़ांच्या आडून साधला ‘मनसे’ ने मनपावर निशाणा!
3 इमारतींच्या दुर्दशेने शिक्षणाचा खेळखंडोबा!
Just Now!
X