बदलत्या काळाचा वेध घेत मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रभात प्रकाशनाच्या शिवा घुगे यांनी मराठी पुस्तके, सांस्कृतिक घडामोडी आणि एकूणच तरुण पिढीला आकृष्ट करून घेण्यासाठी ‘बुकबाजार’ हे ऑनलाइन मराठी व्हिडिओमासिक सुरू केले आहे.
या ऑनलाइन मासिकात केवळ लेख किंवा अन्य माहिती न देता काही मुलाखती आणि ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून विषय मांडण्यात आले आहेत. हे मासिक सुरू करण्यापूर्वी घुगे यांनी व्हिडिओ दिवाळी अंकाचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाला जाणकारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी ऑनलाइन मराठी व्हिडिओ मासिक सुरू करण्याचे धाडस केले आहे.
मासिकाच्या ताज्या अंकात कवी प्रसाद कुलकर्णी यांची ध्वनिचित्रफीत ऐकायला आणि पाहायला मिळते. कुलकर्णी हे त्यांच्या ‘बी पॉझिटिव्ह’ या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधत कविता सादर करतात. त्यांच्या या कविता तरुणांमध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतात. आर्थिक विषयाचे अभ्यासक जयराज साळगावकर यांनी आयुष्यात पैशाला महत्त्व किती या विषयी केलेले विवेचन, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात झालेले बदल या विषयी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मांडलेले विचार पाहायला मिळतात. दहावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या विद्याशाखांकडे प्रवेश घेण्यासाठी आपल्या मुलांना भाग पाडतात. कॅप्टन वंजारी यांनी सैन्यदलातील नोकरी ही एक चांगली संधी कशी आङे, ते या मासिकात सांगितले आहे.  
ऑनलाइन मराठी व्हिडिओ मासिक हा मराठीत एक वेगळा प्रयोग म्हणून आपण सुरू केला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांसाठीु‘ुं्नं१.ूे या मासिकातून आपण नेहमी वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे घुगे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क ८६५५५२३४३०