शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज व तुलशी कास्टिंग्ज अँड मशिनिंग लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे या उभय संस्थांत तांत्रिक अभ्यासासंदर्भात तसेच विद्यार्थ्यांना प्रगत माहिती आणि तंत्रज्ञान व संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राधान्याने उपलब्ध होणार आहे. सामंजस्य करारावेळी कंपनीचे एचआरडी व्यवस्थापक अनिलकुमार फाळके यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टेक्निकल व संशोधनकामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी चौगुले, प्राचार्य आर. ए. चराटे, श्री दत्त ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी विश्वास तथा दादा काळे, प्रा. एस. आर. चौगुले, विभागप्रमुख प्रा. पी. आर. पाटील, प्रा. एन. एन. कुलकर्णी, प्लेसमेंट सेल्सचे प्रमुख प्रा. व्ही. जी. हिंगमिरे, बी. एन. चौगुले उपस्थित होते.