News Flash

‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन

अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगण्यासाठी येरवडय़ात गेल्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धिसाठी त्याची पत्नी मान्यता पुढाकार घेणार, असे बोलले जात होते. पण संजयची बहीण खासदार प्रिया दत्त

| May 31, 2013 12:21 pm

अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगण्यासाठी येरवडय़ात गेल्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धिसाठी त्याची पत्नी मान्यता पुढाकार घेणार, असे बोलले जात होते. पण संजयची बहीण खासदार प्रिया दत्त आणि मेव्हणा कुमार गौरव पुढे सरसावले असून या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन पार पडले.
संजय तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो टी. पी. अगरवाल निर्मित ‘पोलीसगिरी’.
या चित्रपटाच्या ट्रेलरचे उदघाटन मंगळवारी झाले  संजयची अनुपस्थिती प्रमोशनकरता मारक ठरणार आहे हे खरे आहे. पण, या परिस्थितीत त्याच्या कुटुंबियांकडून प्रमोशनचे काम करून घेणे पटणारे नाही, असे निर्माता अगरवाल यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:21 pm

Web Title: polisagiri trailer launched
टॅग : Cinema,Entertainment
Next Stories
1 ‘चिरंतन’मध्ये सूरांचा ‘त्रिवेणी संगम’
2 शाहरूख खान रुग्णालयातून घरी
3 असा आहे आठवडा !
Just Now!
X