नवीन वर्षांसाठी कामगार संघटना आणि यंत्रमाग मालक संघटना यांच्यामधील नवीन करार करण्यासंदर्भात कामगार सहआयुक्त आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र प्रथम प्रस्ताव कोण देणार, यावरच ही बैठक तहकूब करण्यात आली. करारासंदर्भात बैठक २९ तारखेला कामगार सहआयुक्त आयुक्त कार्यालयात होणार आहे.
दरवर्षी कामगार संघटना आणि मालक संघटना यांच्यामध्ये पुढील वर्षांच्या कामाच्या पद्धती ठरवण्यासंदर्भात करार करण्याची परंपरा चालत आली आहे. त्यानुसार यापूर्वीच्या कराराची मुदत ३१ तारखेला संपले. त्यामुळे प्रभारी कामगार सहआयुक्त गुजर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटना आणि मालक संघटनांची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या वेळी तोंडी झालेल्या चर्चेमध्ये कामगार संघटनांनी १० हजार मासिक पगार, दररोज आठ तास काम आणि एक साप्ताहिक सुट्टी अशा प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या. यावर मालक संघटनांनी प्रस्ताव आल्याशिवाय कोणतीच चर्चा होणार नसल्याने प्रस्ताव आला तरी आम्ही यावर नक्कीच विचार करू, असे सांगत १० हजार पगाराची मागणी मात्र ठामपणे मान्य नसल्याचे सांगितले आणि पिसरटेप्रमाणे पगार देण्याचा मुद्दा मांडला.प्राथमिक गरजांची पूर्तता करून या व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी वेळ आज येऊन ठेपली आहे. या बैठकीसाठी मालक संघटना आणि कामगार संघटना उपस्थित होत्या.