लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांना स्वातंत्र्यदिनी उजाळा देण्याच्या उद्देशाने गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता विचारप्रवर्तक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रि. बी. एन्. वैद्य सभागृह (राजा शिवाजी विद्यालय), हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे हे चर्चासत्र होणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत सत्यनारायण साहू यांचे व्याख्यान होणार आहे.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आपली मते मांडणार आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत.