17 November 2017

News Flash

राजस्थान आणि आमिरचा घागरा

राजस्थानमध्ये आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रिकरणासाठी अंगावर ब्लेझर,

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 16, 2013 1:58 AM

राजस्थानमध्ये आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रिकरणासाठी अंगावर ब्लेझर, घागरा आणि गळ्यात लटकवलेला रेडिओ अशा वेशातीला आमीर खानची छायाचित्रे टिपली गेली. आमिरच्या या घागऱ्यातील छायाचित्राने ‘पीके’ चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘मुन्नाभाई’ चित्रपटांची मालिका आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांच्या यशामुळे राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ या चित्रपटाबद्दल कमालीची चर्चा आहे. यात राजकुमार हिरानी, आमिर खान आणि संजय दत्त असे तिहेरी अफलातून मिश्रण अनुभवता येणार आहे. या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने त्याच्या नावापासून कथेपर्यंत अद्याप फारसे काही हाती लागलेले नाही. सध्यातरी बाहेर पडले आहेत ते मिस्टर परफेक्शनिस्टचे घागऱ्यातील छायाचित्र. याशिवाय, पारंपारिक राजस्थानी वेशातील आमिरवरही चित्रिकरण सुरू असले तरी घागरा आणि ब्लेझर या चिवित्र पेहरावातील आमिरबद्दल सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

First Published on February 16, 2013 1:58 am

Web Title: rajasthan and skirt of amir khan