29 May 2020

News Flash

दिवाळीच्या पाडव्याला राजेश खन्नाची गाणी

दिवाळीच्या पाडव्याला साम टीव्हीवर राजेश खन्नाची गाजलेली गाणी नवीन कलावंत सादर करणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘राजेश खन्ना - द सुपरस्टार’ हा

| November 11, 2012 01:36 am

दिवाळीच्या पाडव्याला साम टीव्हीवर राजेश खन्नाची गाजलेली गाणी नवीन कलावंत सादर करणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘राजेश खन्ना – द सुपरस्टार’ हा कार्यक्रम दाखविला जाणार आहे.
हॅप्पी लकी एण्टरटेन्मेंटने राजेश खन्नाला सांगितिक आदरांजली वाहणारा कार्यक्रम साम टीव्हीच्या सहकार्याने आयोजित केला होता. राजेश खन्ना म्हटले की, ‘मेरे सपनों की रानी’, ‘दुनिया में लोगोंको’, ‘बहारों मेरा जीवन भी सवारो’, ‘हमे तुमसे प्यार कितना’, ‘ये जो मोहब्बत है’,  ‘चला जाता हूँ कीसी की धून में’ अशी गाजलेली गाणी लगेच आठवतात. ही सगळी गाणी अमेय दाते, संजीवनी भिलांडे, चिंतन बाकीवाला, मिलिंद इंगळे, रवी त्रिपाठी, वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आदी गायक-गायिका सादर करणार आहेत. राजेश खन्ना-शर्मिला टागोर, राजेश खन्ना-आशा पारेख, राजेश खन्ना-मुमताज या हिंदीच्या रूपेरी पडद्यावर गाजलेल्या जोडय़ांचे अनेक चित्रपट सहजपणे आठवतात. राजेश खन्नाची स्टाईल, त्याला मिळालेली गाणी, त्याच्या नायिका यामुळे त्याला मिळालेली लोकप्रियता, डिम्पल कपाडियासोबत त्याने केलेला विवाह यांसारख्या अनेक गोष्टी चटकन आठवतात. राजेश खन्नाच्या आठवणीही या कार्यक्रमामध्ये जागविल्या जाणार आहेत.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2012 1:36 am

Web Title: rajesh khannas songs on diwali festival
टॅग Diwali,Rajesh Khanna
Next Stories
1 सूर्यकिरणांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन
2 पाण्याच्या राजकारणात जिल्हा भकास होण्याची चिन्हे
3 नगर शहरात डेंगीने एकाचा बळी
Just Now!
X