परभणी शहर महापालिका राबवित असलेल्या रमाई घरकुल योजनेंतर्गत ३१५ पात्र लाभार्थ्यांना पाच टप्प्यांत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
रमाई घरकुल योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शहरातील ३१५ लाभार्थ्यांची निवड झाली. लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २० हजार, दुसऱ्या टप्प्यात ४० हजार, तिसऱ्या टप्प्यात ३० हजार, चौथ्या ५० तर पाचव्या टप्प्यात ६० हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्याचे अनुदान बँकेत जमा होताच लाभार्थ्यांनी शहर अभियंता वाघमारे यांच्याशी ९४२२२२६३७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कामाची सुरुवात करावी. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरा टप्पा वितरित केला जाणार नाही.
लाभार्थ्यांनी अनुदानाचा लाभ घेत आपले घरकुल चांगले बांधण्याचा प्रयत्न करावा, भूलथापांना बळी पडू नये, तसेच दलालांशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, आयुक्त सुधीर शंभरकर, विजय जामकर आदींनी केले आहे.