साप्ताहिक बाजार भाव विश्लेषण
मागील आठवडय़ात येथील बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या आवकमध्ये वाढ झाली असली तरी भाव मात्र जैसे थे राहिले. आवक वाढल्याने भाव कमी होण्याची शक्यता होती. परंतु तसे काहीही न झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधान आहे.
लासलगाव
कांदा- एकूण आवक ११९५१५ क्विंटल. लाल कांदा भाव ८५१ ते १४५० रुपये प्रतिक्विंटल. सरासरी १३४१. उन्हाळ कांदा भाव ४०० ते ११६९ पर्यंत. सरासरी ९५० रुपये.
गहू – एकूण आवक ३०४ क्विंटल. भाव १६०० ते २४४१ पर्यंत. सरासरी २०१७ प्रतिक्विंटल
मूग – एकूण आवक २० क्विंटल. भाव ३७०० ते ४८०० पर्यंत. सरासरी ४५०९.
बाजरी – एकूण आवक ६२ क्विंटल. स्थानिक भाव १५०५ ते १९५१ पर्यंत. सरासरी १७१७. संकरित भाव १२०० ते १६०१ पर्यंत. सरासरी १५२७.
ज्वारी – एकूण आवक ६ क्विंटल. संकरित भाव १२६० ते १२६१ पर्यंत. सरासरी १२६०.
हरभरा – एकूण आवक ४५ क्विंटल. स्थानिक भाव २६७५ ते ४००१ पर्यंत. सरासरी ३४८०. जंबुसार भाव ३५०० ते ४३११ पर्यंत. सरासरी ३९०४. काबुली भाव २७९९ ते ५५०१ पर्यंत. सरासरी ३९७५.
सोयाबीन – ६४२ क्विंटल. भाव २८५१ ते ३२५५ पर्यंत. सरासरी ३१८४.
मका – एकूण आवक ४३१०५ क्विंटल. भाव १२४५ ते १४३१ पर्यंत. सरासरी १३९३ रुपये
भाजीपाल्याची आवक व भाव
मेथी १०९०५० जुडी. भाव ४१५ तर सरासरी ३१८. शेपू २२५०० जुडी. भाव ५०२ तर सरासरी ३८२. कांदा पात १५१०० जुडी. भाव ६७१ तर सरासरी रुपये ५०५. कोथिंबीर १५८०० जुडी. भाव ८०१ तर सरासरी ४९९. काकडी ९५२ करंडे. भाव ३४९ तर सरासरी २९१. वांगी ५३४ करंडे. भाव १०६ तर सरासरी ५६. भोपळा १५४ करंडे. भाव ९३ तर सरासरी ४९. कारले २०१ करंडे. भाव १९८ तर सरासरी १६५. टोमॅटो १०२५ करंडे. भाव ९३ तर सरासरी ४७. मिरची २८५ करंडे (पिकेडोर) भाव १३७ तर सरासरी ९९. मिरची ९९९ करंडे (शिमला) भाव १२७ तर सरासरी ९६. भेंडी १७० करंडे भाव ३४५ तर सरासरी २७७. द्राक्षमणी ५२ करंडे. भाव ५०२ तर सरासरी २६०. दोडके ६३८ करंडे. भाव   १०६    तर   सरासरी ११८. वाल ८०७ करंडे. भाव १५१ तर सरासरी १२५. कोबी ५ ट्रॅक्टर. भाव ३०००  तर    सरासरी   १३००. फ्लॉवर ३१ गोणी भाव  १८५ तर सरासरी १५२ रुपये
निफाड उपबाजार आवार
कांदा एकूण आवक ७१५ क्विंटल. भाव ७०० ते १४२५ रुपयांपर्यंत. सरासरी १२५२ रुपये. उन्हाळ कांदा भाव ४६० ते ११०१ पर्यंत. सरासरी १०००. गहू एकूण आवक १८१ क्विंटल. भाव १३०० ते १९५१ पर्यंत. सरासरी १८२१. मका एकूण आवक १४०२४ क्विंटल. भाव ११७० ते १४०० पर्यंत. सरासरी १३५०. हरभरा एकूण आवक ७ क्विंटल. भाव २३७५ ते ३८०० पर्यंत. सरासरी ३०००. सोयाबीन ४५८ क्विंटल. भाव २८५२ ते ३२०० पर्यंत. सरासरी ३१७५ रुपये
विंचूर उपबाजार आवार
गव्हाची एकूण आवक ७९ क्विंटल. भाव १४०० ते २०७९ पर्यंत. हरभरा एकूण आवक पाच क्विंटल. भाव २००१ ते ४३०१ पर्यंत. सरासरी ३३५१. सोयाबीन ८३३ क्विंटल. भाव २५००   ते    ३२६१ पर्यंत.    सरासरी  ३१७५. बाजरी एकूण    आवक   २३ क्विंटल. भाव १३२५ ते १६५५ पर्यंत. सरासरी १६०३.