News Flash

संत गोरोबाकाका पालखीचे पारंपरिक उत्साहात स्वागत

पंढरपूरच्या काíतकी सोहळ्यास जाणारी मराठवाडय़ातील संताची एकमेव पालखी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्रीसंत गोरोबाकाकांची आहे. या पालखीचे मंगळवारी उस्मानाबादेत पारंपरिक उत्साहात आगमन झाले.

| November 6, 2013 01:47 am

पंढरपूरच्या काíतकी सोहळ्यास जाणारी मराठवाडय़ातील संताची एकमेव पालखी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्रीसंत गोरोबाकाकांची आहे. या पालखीचे मंगळवारी उस्मानाबादेत पारंपरिक उत्साहात आगमन झाले. येथील मुक्कामानंतर उद्या (बुधवारी) तिचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
संत गोरोबा काका पंढरपूरला काíतकी सोहळय़ास जात असत. तीच परंपरा तेरच्या वारकरी सांप्रदायाने अव्याहत सुरू ठेवली. ही पालखी तेरहून िहगळजवाडी, उस्मानाबाद, भांतबरे, वैराग, यावली, खैराव, अनगर, रोपळे येथे मुक्काम करून पंढरपूरला दशमीदिवशी पोहोचते. काíतक सोहळ्यानंतर पालखी येवती, खंडोबाची वाडी, कुंभेज, कापसेवाडी, काळेगाव, साकत, िपपरी, कौडगाव, सांजा, काजळा येथे मुक्काम करून तेरला येते. पालखी जात असताना बार्शी तालुक्यातील वैराग ते यावली हा रस्ता खराब असल्याने त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. तेरहून पंढरपूरला जाताना वैराग मुक्काम करून यावलीकडे जाताना ढोराळा गाव लागते. हे गाव गोरोबाकाकांचे आजोळ असल्याचे सांगितले जाते.
पालखी येणार असल्याने ढोराळा गावातील गावकरी लग्न झालेल्या लेकींनाही आवर्जून माहेरी बोलवितात. िदडीतील प्रत्येक वारकऱ्याची पाद्यपूजा करून त्यांना भोजन दिले जाते. पालखी अनगर मुक्कामी असते. या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील कुटुंबीयांच्या वतीने वारकऱ्यांची सोय केली जाते. पूर्वी पालखी पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागा नदीच्या काठी राहुटी उभी करून सेवा पार पाडत असे. ४० वर्षांपूर्वी कुंभारगल्ली येथे वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून सुरक्षितता मिळावी, म्हणून तेर येथील दिवंगत विश्वनाथअप्पा देशमाने यांनी पुढाकार घेऊन जागा घेतली. तेथे श्रीसंत गोरोबाकाका मठाचे बांधकाम केले. सध्या याच ठिकाणी पंढरपूरला पालखी गेल्यावर मुक्कामी असते. तेरहून पंढरपूरला जाईपर्यंत गावोगावचे जवळपास साडेतीन हजार वारकरी सहभागी होतात. पालखीतील वारकऱ्यांना उपरणे, ओळखपत्र, तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून तेरणा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. तसेच तीन अब्दागिरी खरेदी करण्यात आल्या. वारकऱ्यांचे साहित्य ठेवण्यास तीन वाहनांची, तसेच वीजजनित्राची सोय करण्यात आल्याची माहिती गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी दिली. शिवाजी रोंगे, नामदेव थोडसरे, विश्वास सोनवणे, अरुण आबदारे, आगलावे गुरुजी आदी वारक ऱ्यांनी पालखीत सहभागी होतानाची भावना या निमित्ताने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 1:47 am

Web Title: sant goroba palkhi welcomed
Next Stories
1 पाणी वापरासंदर्भात नव्या करारांची आवश्यकता – पुरंदरे
2 ऐन दिवाळीतही जालना शहरातील पथदीवे बंदच!
3 औरंगाबाद-जालना रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश
Just Now!
X