सावरकर स्मारकाचा मदतीचा पहिला टप्पा
उत्तराखंडातील महाप्रकोपानंतर अद्यापही येथील ज्या डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील गावांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मदत पथक पोहोचले होते. या पथकातील सदस्यांनी तेथील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून स्मारकातर्फे तीन लाख रुपयांची शिधासामग्री वितरित केली.  नागरिकांना दिलेल्या पाकिटात गव्हाचे पीठ, तांदूळ, मिश्र डाळी, तेल, साखर, चहा, खजूर, मसाले आदी साहित्यांचा समावेश होता.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात राजेंद्र वराडकर, नरेंद्र केणी हे सहभागी झाले आहेत. या दोघांनी गौरीकुंड परिसरातील रामपूर, रेलगाव, धारगाव, तरसाळी, खोलबिडासू आदी दुर्गम गावांत जाऊन मदत पोहोचविली. यानंतर लवकरच मदतीचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे.