मुलांच्या परीक्षा संपल्यात. सुट्टय़ांची मौजमस्ती सुरू झाली आहे. अशा वातावरणात खेळता खेळता मुलांचा आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढवणारी जादूई कमाल झाली तर पालकांचा आनंद गगनात मावेनासा होईल. सुप्रसिध्द जादूगार भूपेश दवे यांनी जादूचे प्रयोग शिकवता शिकवता मुलांमधल्या आत्मविश्वासाला बळकट करण्याची कला अवगत केली असून त्याचा अनुभव देण्यासाठी  ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी ‘पंख आत्मविश्वासाचे’ ही कार्यशाळा त्यांनी आयोजित केली आहे. जादूचे प्रयोग करता करता स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा, याचे धडे मुलांना या कार्यशाळेतून मिळतील. त्याचबरोबर संभाषण कला विकसित करण्याचे तंत्र, सकारात्मक दृष्टिकोणाचे मंत्र अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण मुलांना देणारी ही कार्यशाळा १५ एप्रिल ते १० मे आणि १३ मे ते ७ जून अशा दोन कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दादर, घाटकोपर, ठाणे, भाईंदर इथे ही कार्यशाळा होणार फी आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज २ तास चालणाऱ्या या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या मुलांना जादूच्या उपकरणांचे संच, शिबिराची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत, जादू अकादमीचे सभासदत्वही देण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९८२००३८९७६, ९८२०४३३२२५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.