१७ जानेवारी १९८८ रोजी नाशिक महानगरातील इंदिरानगरमध्ये अ‍ॅड. मधुकर ओक, रामकृष्ण केळकर, प. रा. चांदे आदी  ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन ‘कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ’ची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी विखुरलेल्या स्वरुपातील इंदिरानगर उपनगरात निरनिराळ्या गृहनिर्माण संस्थांच्या घरांची संख्याही वाढत होती. रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत बससेवा, पथदीप यांसारख्या सुविधा मिळण्यासाठी संघाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. ज्येष्ठ नागरिकांची घरामध्ये होणारी कुचंबणा लक्षात घेत संघाने आपल्या साप्ताहिक सभांमधून विविध कार्यक्रम सुरू केले.
प्रथम सभासदांच्या घरी फिरत्या स्वरुपात होणाऱ्या साप्ताहिक सभा पुढे मोदकेश्वर मंदिरासमोरच्या हॉलमध्ये भरू लागल्या. नंतर त्या विवेकानंद सभागृहात होऊ लागल्या. दौलतराव आहेर यांच्या आमदार निधीतून संघाला सद्याचे भवन बांधून मिळाले. सध्या तेथे सभा भरतात. २००८ मध्ये नगरसेवक सुनील खोडे यांनी संघाला प्रवेश व्दाराजवळ एक दगडी व्यासपीठ बांधून दिले. कृतार्थ भवनच्या उभारणीनंतर सभासदांच्या सहकार्याने साहित्य खरेदी करण्यात आले. संघातर्फे व्याख्याने रक्तदान शिबीर, आरोग्य, वाचनालय, सभासदांचे वाढदिवस साजरे करणे इ. कार्यक्रम घेतले जातात. महिन्यातील पाचव्या गुरूवारी महिला कार्यक्रम सादर करतात.
संघाच्या सदस्यांनी आपल्या वाढदिवशी उत्स्फूर्त देणग्या देऊन संघाची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खेळांच्या स्पर्धा, ज्येष्ठांसाठी निबंध स्पर्धा, दहावी-बारावीमधील गुणवंतांचा सत्कार, कर्तव्यतत्पर पोस्टमन, वृद्धांना आपुलकीची वागणूक देणारे बस वाहक व चालक यांचा सत्कार, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पाच हजार रूपयांपर्यंत मदत, असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोकण, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, काश्मिर अशा ठिकाणी सहली नेण्यात आल्या. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे पुस्तक पेटी वाचनालयाची सुरूवात कृतार्थपासूनच झाली आहे. सभासदांसाठी एक विरंगुळा केंद्र, वाचक मंच चालविला जातो. भगवद््गीतेतील
श्लोक वाचणे व त्याचा अर्थ समजावून घेणे हेही नियमितपणे केले जाते.
कृतार्थचे सभासद अनंत घोलप, विद्याधर पाध्ये, प्रकाश कुलकर्णी हे फेस्कॉमचे काम पहातात. मनोहरी मनोयुवा या फेस्कॉमच्या मुख्य पत्राचे संपादन, छपाई, वितरण इ. कामे १२ वर्षांपासून करत आहेत. त्यांना अतिशय संघटीतपणे कृतार्थच्या इतरांकडून साथ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पातळीवर तसेच प्रादेशिक पातळीवर आदर्श संघ म्हणून कृतार्थचा गौरव झाला आहे.
आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र-भारतच्या पुण्यातील संस्थेतर्फे यंदा महाराष्ट्रातील उत्कृष्ठ संघ म्हणून बी. जी. देशमुख स्मृती पारितोषिक १० हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्रक देऊन संघाचा गौरव झाला आहे.

*नाशिक येथील इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षांचा समारोप आणि कृतार्थ स्मरणिका प्रकाशन सोहळा २१ जानेवारी रोजी होणार आहे. कृतार्थ भवनात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे हे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा माजी अध्यक्ष चं. वि. तळवेळकर यांनी घेतलेला आढावा.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा