गोदावरी नदीवरील मुद्गल बंधाऱ्यात अडविलेले पाणी परळी औष्णिक केंद्रासाठी सोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. मात्र, शिवसेनेने त्यास विरोध दर्शवून शनिवारी (दि. १५) बंधाऱ्यावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.
या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडी जलाशयात पाण्याचा पुरेसा साठा नाही. खडका बंधाऱ्यातून परळीच्या औष्णिक केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. या बंधाऱ्यात सध्या पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याअभावी औष्णिक केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परळीच्या औष्णिक केंद्रासाठी मुद्गल बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, मुद्गल बंधाऱ्यावर पाथरी व सोनपेठ तालुक्यांतील २० गावांच्या पिण्याचे पाणी व सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे परळीच्या औष्णिक केंद्रास बंधाऱ्यातून पाणी सोडू नये, अशी शिवसेनेची मागणी आहे.
शेतक ऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी १५ डिसेंबरला दुपारी १ वाजता मुद्गल बंधाऱ्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, आमदार मीरा रेंगे व जिल्हाप्रमुख बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख जाधव यांच्यासह उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, डॉ. संजय कच्छवे, बाळासाहेब आरबाडी, अशोक कानमोडे यांच्या सहय़ा आहेत.