जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई निवारणाच्या कामाबाबतच्या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्य़ात २९७ टँकर्सच्या द्वारे वाडय़ावस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात असून जनावरांच्या २५५ छावण्या सुरू आहेत.
टंचाई निवारणाच्या कामाबाबत कोणाची काही तक्रार असल्यास किंवा अन्य कोणती माहिती हवी असल्यास संबधितांना या कक्षाबरोबर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कक्षाचा दुरध्वनी क्रमांक (०२४१) २३४३६०० असा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवन मध्ये हा कक्ष आहे.