News Flash

सोलापुरात रुग्णालयास आग लागल्याने रुग्ण रस्त्यावर

शहरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळील कोठाडिया नìसग होममध्ये रात्री अचानक आगीची दुर्घटना घडली. आगीच्या भीतीमुळे रुग्णालयातील रुग्ण रस्त्यावर धावत आले.

| November 15, 2013 02:03 am

शहरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळील कोठाडिया नìसग होममध्ये रात्री अचानक आगीची दुर्घटना घडली. आगीच्या भीतीमुळे रुग्णालयातील रुग्ण रस्त्यावर धावत आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. तर याच वेळी आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नलिन व प्रदीप कोठाडिया बंधूंच्या बहुमजली नìसग होममध्ये रात्री नेहमीप्रमाणे वर्दळ संपत असतानाच अचानकपणे आगीची दुर्घटना घडली. एका रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय इमारतीच्या उंच गच्चीवर जेवणाचा डबा घेऊन जेवावयास गेले होते. मात्र त्यांनी छतावर आगीचे लोळ पाहिले. त्यांनी तत्काळ रुग्णालयातील कर्मचा-यांना त्याची कल्पना दिली. तेव्हा लगेचच आग विझवण्यासाठी रुग्णालयातील सीझफायर यंत्रणेचा वापर केला गेला. परंतु ही यंत्रणा अपुरी पडली तेव्हा शेजारच्या इमारतीवरून स्थानिक नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. छतावर ठेवण्यात आलेल्या केबल वायरच्या अ‍ॅम्प्लीमध्ये आग लागली होती, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. या दुर्घटनेत फायबरचे पत्रे आणि वायर यंत्रणेचे नुकसान झाल्याचे दिसून आले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:03 am

Web Title: sick on the road due to fire in hospital at solapur
टॅग : Fire
Next Stories
1 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीचे लोण आता मोहरममध्येही…
2 दोन्ही काँग्रेसची आघाडीकडे वाटचाल
3 सहाशे शाळांना शैक्षणिक सॉफ्टवेअर
Just Now!
X