News Flash

विवेकानंद जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य शोभा यात्रा

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शनिवारी आयोजित करण्यात आलेली शोभायात्रा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरी झाली. ठाण्यातील कळवा ते विटावा या भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात आली

| January 15, 2013 12:11 pm

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शनिवारी आयोजित करण्यात आलेली शोभायात्रा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरी झाली. ठाण्यातील कळवा ते विटावा या भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. ‘स्वामी विवेकानंद सार्धेशती समिती’ तर्फे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.   
कष्टकरी महिलांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा, त्यांच्या विविध संदेशांचे फलक यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी यावेळी झळकाविले.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभाग घेतला होता. यात्रेत सादर करण्यात आलेल्या लेझिम नृत्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. टीजेएसबी सहकारी बँकेचा यात्रेतील सहभाग उल्लेखनीय होता. ठाण्याच्या विविध भागांतील नागरिक मोठय़ा उत्साहाने यात्रेत सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:11 pm

Web Title: sobha yatra in thane on swami vivekanad jayanti
Next Stories
1 वाहतूक पोलिसांचा ‘हट्ट’ नडला!
2 शिक्षण, उद्योग कार्यशाळेत डॉ. माशेलकरांचे मार्गदर्शन
3 अंबरनाथमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
Just Now!
X