तूर शहराला तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. सरकारने एमआयडीसीला दिले जाणारे पाणी जूनपर्यंत बंद करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.
मांजरा धरणातून लातूर शहराबरोबरच कळंब, अंबाजोगाई, केज व लातूर एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. सध्या पाण्याची गरज २१ दलघमी व धरणातील उपलब्ध साठा १० दलघमी असे व्यस्त प्रमाण आहे. लातूर एमआयडीसीला सुमारे साडेतीन दलघमी पाणी जूनपर्यंत दिले जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणी देणे बंद करावे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
मांजरा धरणावर बांधलेल्या बंधाऱ्यातून अडचणीच्या काळात लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याची संकल्पना विलासराव देशमुख यांची होती. दुर्दैवाने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रचंड टंचाई असतानाही असे पाणी आरक्षित करण्यासंबंधीचा ठराव झाला नाही. लातूर शहराला भंडारवाडी किंवा मन्याडमधून पाणी आणण्याची भाषा आमदार अमित देशमुख करीत असले, तरी त्यासंबंधीचे कोणतेही नियोजन केले गेले नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत साधा ठरावही मांडला गेला नाही. आमदार व जिल्हा प्रशासन  जनतेच्या   डोळय़ांत  धूळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.