वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे आता लवकरच सुरू होण्याच्या बेतात असून तासनतास प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी उपहारगृहांपासून ते बँक व्यवहारांसाठी एटीएम यंत्रणेपर्यंतच्या सर्व सुविधा मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक मेट्रो स्थानकावर त्यासाठी सुमारे १०० चौरस मीटरची जागा त्यासाठी ठेवण्यात आली आहे.
मुंबईकरांचा बराच वेळ प्रवासात जातो. त्यामुळे तहान-भूक भागवण्यापासून ते संपर्क व्यवस्था आणि अडीअडचणीच्या वेळी तातडीने हाती पैसे पडण्याची व्यवस्था या साऱ्या गोष्टी आता मुंबईकरांसाठी चैन नव्हे तर प्राथमिक गरजा झाल्या आहेत. मुंबईकरांची हीच गरज ओळखून मेट्रो रेल्वे बांधणाऱ्या आणि चालवण्याची जबाबदारी असलेल्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ या कंपनीने मेट्रो रेल्वेची स्थानके ही सुरक्षा यंत्रणांबरोबरच प्रवाशांच्या या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सुसज्ज असतील अशी व्यवस्था केली आहे.

पोटपुजेसाठी..
* स्ट्रीट फूड्स ऑफ इंडिया
* बेकर्स स्ट्रीट
* हॅवमोर आइस्क्रीम
संपर्कसुविधा
* स्कायटेक : मोबाइलधारकांच्या विविध गरजा या कंपनीच्या दालनाच्या माध्यमातून भागवल्या जातील.
 एटीएम
* कोटक महिंद्र बँक