01 March 2021

News Flash

तमाशा कलावंताचा फडातच मृत्यू

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या संध्या माने-सोलापूरकर या तमाशातील कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ शेगर (रा. मेडद तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर) याचा आज

| May 1, 2013 01:41 am

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या संध्या माने-सोलापूरकर या तमाशातील कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ शेगर (रा. मेडद तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर) याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हिरडगाव येथे नागनाथाची यात्रा आहे. या यात्रेसाठी संध्या माने यांचा तमाशाचा फड गावात आला आहे. तमाशात गावच्या सरपंचाची भूमिका करणारे नवनाथ शेगर यांना आज सकाळी हजेरी सुरू असताना त्रास जाणवू लागला, दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तमाशा फडावर शोककळा पसरली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम दरेकर यांनी त्यांना मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 1:41 am

Web Title: tamasha artist died
टॅग : Died
Next Stories
1 नायब तहसीलदार नागवडे व तलाठी दातरंगेला महिनाभराची कैद, दंडही
2 पारनेर तहसीलदारांचा मुळा पात्रात छापा
3 गाळ काढण्यासाठी आजपासून मोहीम
Just Now!
X