जिल्हा व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक शामप्रकाश देवकीनंदन देवडा यांचे हृदयविकाराने शुक्रवारी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, राजीव सातव, ओमप्रकाश पोखर्णा, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे आदी त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित होते. देवडा यांच्यमागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू, दोन भाऊ असा परिवार आहे. पीपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश देवडा यांचे ते थोरले बंधू होत. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून देवडा यांना श्रद्धांजली वाहिली.