वाचनसंस्कृतीचा विकास करतानाच वैज्ञानिक समाजवादाची भूमिका समाजात रुजविण्यासाठी संघटितपणे व्यापक प्रयत्न करण्याचा निर्णय इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे होते. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून गतवर्षांच्या कार्याचा व उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी वर्षांतील योजनांची मांडणी केली.    
प्रबोधिनीच्या विविध शाखांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी शाखांच्या कार्याचा अहवाल मांडला. त्यावर झालेल्या चर्चेत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. विजयकुमार जोखे, प्राचार्य शंकरराव कदम आदींनी सहभाग घेतला. या वेळी प्रबोधिनीच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या सदस्यांसह सर्व शाखांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रबोधिनीचे काम जाणून घेण्याच्या हेतूने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सांगली) आणि के. आय. टी. कॉलेज (कोल्हापूर)चे काही विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या वेळी प्रवीण सूर्यवंशी आणि शिवाजी दुगार्डे यांनी प्रबोधिनीची गाणी सादर केली. तर एम. टी. सामंत यांनी आभार मानले.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”