रूढी, परंपरा व कर्मकांड यांना विरोध करीत वीरशैव लिंगायत समाजाला संजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बसवेश्वरांनी केले. त्यांचे कार्य आधुनिक समाजाला आजही मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथे वीरशैव तरुण संघ व लिंगायत समाज यांच्या वतीने बसवेश्वर जयंती उत्सवनिमित्त आयोजित प्रतिमापूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
बाराव्या शतकात भारतीय समाजात स्त्रियांचे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सन्मान, सामाजिक समानता, ग्रामविकास, दुष्काळ निवारण यांसारख्या विचारांवर भर देऊन जनसेवा हीच ईश्वरसेवा असे सांगणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे फार मोलाचे व धाडसी होते, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
आ. जयप्रकाश छाजेड, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी वीरशैव तरुण संघाचे अध्यक्ष रवींद्र दिवटे, प्रमोद हिंगमिरे, अनिल कोठुळे उपस्थित होते.