कमी पावसामुळे जिल्ह्य़ात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ११७ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त उपसा करण्यासही बंदी घालण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरीया यांनी दिली.
टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या ११७ गावांमध्ये शहादा तालुक्यातील २८ गावांचा समावेश असून त्यात चांदशैली, लंगडीभवानी, शहाणे, भोगरा, वडगाव, नवानगर, जावदे, तितरी, कलमाडी, भोरटेक, चिखली, डामळदे, ओझर्टे, जाम, काथर्दे, खेडदिगर, टूकी, अनरद, पुसनद, कहाटूळ, लोंढर्रे, वडछील, पिंपर्डे, कवठाड, लोहारा, कमरावद, सावखेडा, या गावांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील २६ गावांमध्ये बालअमराई, भवानीपाडा, धानोरा आदी गावांचा समावेश आहे.अक्कलकुवा तालुक्यातील १० तर, अक्राणी तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 117 villages in nandurbar distrect announce as a lackness villages
First published on: 27-11-2012 at 12:23 IST