शासनाने सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरूस्ती करून सुधारित उपविधी तयार केले आहेत. या सुधारित उपविधीची ७२ पानी पुस्तिका ठाणे जिल्ह्य़ाातील तेराशे पतसंस्थांना मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुधारित उपविधी विषयी अनेक पतसंस्था चालक संभ्रमात असल्याने त्यांना या कायद्याची विस्तृत माहिती मिळावी या उद्देशाने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा नागरी पत संस्था फेडरनेशनचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी या पुस्तिका प्रसिध्द करून वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तिकेचे कपील पाटील, अनंत ठाकूर, जिल्हा उपनिबंधक नितीन काळे, भाऊ कुऱ्हाडे, सुनिल शिंदे, सचिव ज्ञानेश्वर डुंबरे व इतर संचालकांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
ही पुस्तिका पतसंस्था चालकांना मोफत देण्यात येणार आहे. संस्था चालकांनी फेडरेशनच्या ठाणे येथील कार्यालयातून किंवा किशोर कुडव यांच्याशी संपर्क साधून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क, कुडव ९९३०३५९४३९.