माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी स्वागत केले.
अप्पाशा म्हेत्रे हे मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ते समजले जात होते. छगन भुजबळ यांच्या प्रभावाखालील महात्मा फुले समता परिषदेत त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान, नंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले व उपमहापौर झाले. दरम्यान, उपमहापौरपद भोगल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. आता पुन्हा काँग्रेसची साथ सोडून त्यांनी स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत पुनप्र्रवेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appasha mhetre return to ncp
First published on: 23-04-2013 at 01:38 IST