एड्स झाल्याच्या नैराश्याने जोडप्याने घेतला गळफास

आपणास एड्सचा जीवघेणा आजार झाल्याचे समजताच वैफल्यग्रस्त झालेल्या जोडप्याने उपचार सुरू असताना शहरातील यशोधरा रुग्णालयात गळफास घेतला.

आपणास एड्सचा जीवघेणा आजार झाल्याचे समजताच वैफल्यग्रस्त झालेल्या जोडप्याने उपचार सुरू असताना शहरातील यशोधरा रुग्णालयात गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला. तर पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर शर्थीने उपचार सुरू आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे राहणाऱ्या या दुर्दैवी दाम्पत्याचा आजार बळावल्याने यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना रासायनिक तपासणीत दोघांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे दिसून आले. ही बाब त्यांना कळताच दोघेही वैफल्यग्रस्त झाले. ३४ वर्षांच्या पतीने आत्महत्येचा विचार पत्नीकडे (वय २२) बोलून दाखविला. पत्नीनेही आता जीवन जगण्यात अर्थ नसल्याने आत्महत्येची तयारी दर्शविली. त्यानुसार या दाम्पत्याने रुग्णालयातील खोली क्रमांक २०५ मध्ये बाथरूममध्ये लुंगी व ओढणीने गळफास घेतला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.
गळफास घेतलेल्या दाम्पत्याला फासातून मुक्त केले असता त्यापैकी पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी बेशुध्द असल्याचे दिसून आले. पत्नीची प्रकृती गंभीर असून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणण्यासाठी शासकीय रुग्णालयात शर्थीचे उपचार केले जात आहेत. जेलरोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Couple suicide husband died