करणी झालेली असल्याने कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आहेत, अशी भीती दाखवत त्यातून बाहेर पडण्यासाठी शारीरिक संबध ठेवण्याचा एकच मार्ग असल्याचे सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी खंडाळा येथील देवऋषी दादा श्रीपती गायकवाड (वय ५८)याला खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत खंडाळा पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, संबंधित महिला कौटुंबिक समस्यांनी ग्रासली होती – समस्यांचे निराकरण करण्यासाठी ती दादा गायकवाडकडे गेली. कोणी तरी करणी केली असल्याने कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. तुमच्यावर कोणी तरी मोहिनी केली आहे. तुम्ही कोठे जाऊ शकत नाही. असे त्याने त्या महिलेला सांगितले. माझ्याशी शरीरसंबंध करून धवजी पाटील सुरुर येथे बकऱ्याच्या मुंडक्यावर १३ खडे सोडावे लागतील तरच त्यातून सुटका होईल; अन्यथा प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल अशी धमकी देत वाई सुरूर व खंडाळा येथे वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले. खंडाळाचे पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दादा गायकवाडला अटक केली असून त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devarishi arrested in case of rape
First published on: 06-01-2014 at 03:06 IST