प्रसिध्द कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मोहन मंगेशराव कंटक (वय ६५) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. कंटक यांच्या पत्नी व तिन्ही मुलीही डॉक्टर असून, त्या पुणे येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. डॉ. मोहन कंटक यांच्यावर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे पाटण येथील असलेले डॉ. कंटक यांनी वैद्यकीय सेवेचे व्रत जोपासताना कराडच्या सामाजिक जीवनात समरस होत शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त केला. कान, नाक, घसा तज्ञ म्हणून राज्यात त्यांची ख्याती होती. १९७४ पासून कराडच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
१९८५ ते २००९ या कालावधीत ते शिक्षण मंडळ कराड या संस्थेवर पदाधिकारी राहिले. दरम्यान, २००३ ते २००८ अशी पाच वष्रे ते शिक्षण मंडळाचे चेअरमन होते. आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानने कराड गौरव व कराड भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. कराड को. ऑपरेटिव्ह नर्सिग होमचे ते चेअरमन असतानाच या  संस्थेची नूतन इमारत नावारूपास आली. इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य ईएनटी फेडरेशन या संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. कुंभरोशी (ता. महाबळेश्वर) येथे माध्यमिक शाळा व आजरा, जि. सिंधुदुर्ग येथे त्यांनी महाविद्यालय सुरू केले. संत सखू मंदिराचा जीर्णोधार व सदाशिवगडाच्या पायऱ्यांचा जीर्णोध्दार त्यांच्या पुढाकाराने झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ent specialist dr mohan kantak passed away
First published on: 13-12-2012 at 08:50 IST