छायाचित्रकार अनंत झांझले यांनी काढलेल्या वन्यजीवन आणि निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले सभागृहात (इंडसर्च संस्थेजवळ) भरणार आहे. हे प्रदर्शन ११ ते १३ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वासाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनामध्ये अरुणाचल आणि आसामच्या जंगलांतील वन आणि वन्यजीवन यावरील दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असणार आहे. तसेच कलाहारी, नामाक्वालँड, बोत्स्वाना आणि मादागास्कर येथील वन्यजीवन आणि निसर्ग छायाचित्रेही प्रदर्शनात असणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘आफ्रिकन सफारी’ आणि १३ जानेवारी रोजी ‘मादागास्कर आणि कलाहारी’ या विषयांवर सायंकाळी ७.३० वाजता स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच इतरही काही पर्यटकांनी टिपलेली छायाचित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exhibition of forest life and nature photografs
First published on: 08-01-2013 at 03:26 IST