इगतपुरी येथील ऑलिम्पिया जिमखान्याच्या हितेश निकमने निफाड तालुक्यातील ओझर येथे आयोजित ‘ओझर श्री २०१३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत किताबाचा मान मिळविला.
जिल्हा संघटनेच्या मान्यतेने सोशल सम्राट ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुपचे अध्यक्ष शेखर जाधव, चारुदत्त जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शरद आहेर, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, माजी आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, सरपंच पार्वताबाई शिंदे, गोविंद काळे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सहा वजनी गटांत झालेली स्पर्धा रंगतदार झाली. प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीने रंगलेल्या या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंना संगीताच्या तालावर प्रात्यक्षिक करताना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मानाच्या किताबासाठी हितेश निकम, नाशिकच्या गोल्ड जिमखान्याचा अक्षय गायकवाड, नितीन बागूल, मालेगावचा उबेदूर रहेमान यांच्यात चुरशीची लढत झाली. परंतु अंतिमत: पंचांचा कौल हितेशच्या बाजूने गेला. स्पर्धेचे बक्षीसवितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitesh nikam become ozar shree
First published on: 12-01-2013 at 12:37 IST