महिंद्र, यश फाऊंडेशन आणि नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स (निमा) यांच्या वतीने निमा हाऊस येथे सातपूर व अंबड येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत आयोजित चर्चासत्रात एचआयव्ही-एड्स या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, डॉ. प्रकाश आहेर, हिंदूस्थान कोका-कोलाचे अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी, महिंद्रचे सुहास गोखले, अशोक बोरस्ते यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, एनपीसी नेटवर्कच्या अध्यक्षा संगीता पवार उपस्थित होते. प्रास्तविकात यश फाऊंडेशनचे अध्यक्ष पाटील यांनी केले. डॉ. आहेर यांनी चित्रफितीव्दारे आजाराविषयी माहिती देत त्याच्या वाढत्या प्रमाणाविषयी चर्चा केली. महिंद्रचे सुहास गोखले यांनी चित्रफित दाखवून कंपन्यांना यात कसे सहभागी करून घेता येईल याची चर्चा केली. हिंदुस्थान कोका-कोलाचे अधिकारी कुलकर्णी यांनी इतर कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. एनपीसी नेटवर्कच्या अध्यक्षा पवार यांनी बचत गटांमार्फत  महिलांना मिळणारा रोजगार यांची माहिती दिली. महिंद्र, यश फाऊंडेशन आणि निमा यांनी एकत्र येऊन शहरातील सर्व कंपन्यांचे मालक, अधिकारी, पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यास सांगितले. नाशिकमध्ये एआरटी सेंटर उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.