विज्ञान संशोधनामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वाटा मोलाचा असून, संशोधकांना संशोधनासाठी हा विषय आव्हानात्मक आहे. भारतातील जास्तीत-जास्त संशोधकांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या विषयाकडे आकर्षित होऊन त्यातील सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करावा असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील फिजिक्स विषयाचे विभागप्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे यांनी केले.
कराडच्या जी. के. गुजर ट्रस्टचे डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एस. जी. एस. कॉलेजचे निवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. संकपाळ, ट्रस्टच्या सचिव डॉ. माधुरी गुजर, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, जनरल विभागप्रमुख प्रा. हेमंत वेताळ, अधिष्ठाता डॉ. संजीवनी क्षीरसागर व प्रा. लक्ष्मण जमाले यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. लोखंडे म्हणाले की, दरवर्षी २८ फेब्रुवारी या विज्ञानदिनी संपूर्ण जगातील नोबेल पारितोषिक विजेते संशोधक जर्मनी येथे कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र जमतात. यापूर्वी या कार्यशाळेमध्ये शिवाजी विद्यापीठातील सात संशोधक सहभागी झाले. यापूर्वीही दोन संशोधक आजच्या विज्ञान दिनाच्या दिवशी सहभागी होत असल्याचे सांगून भारतीय संशोधकांनी नोबेल पारितोषिक मिळविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे असे आवाहन केले.
डॉ. एस. डी. संकपाळ, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, प्रा. हेमंत वेताळ यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या सर्व विद्यार्थी व शाळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील व अक्षदा पाटील यांनी केले. डॉ. संजीवनी क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important part of nano technology in research of science dr c d lokhande
First published on: 11-03-2013 at 08:54 IST