जनआक्रोशच्यावतीने कर आकारणी संदर्भातील मते, त्रुटी किंवा आक्षेपाच्या संबंधी अधिक चर्चा करण्याच्या दृष्टीने उद्या, शनिवारी ८ डिसेंबरला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेने मालमत्ता कराची आकारणी रेडी रेकनर पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. महापालिकेद्वारे १७ नोव्हेंबला सर्व वृत्तपत्रात जाहिरात देऊन आक्षेप व सूचना एक महिन्याच्या आत मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी १८ डिसेंबपर्यंत महापालिकेच्या कर विभागाच्या महाल कार्यालयात आक्षेप व सूचना सादर करावयाच्या आहेत. रेडीरेकनर पद्धतीने करावी आकारणी नागपूर महापालिकेत पहिल्यांदाच होत असल्याने या पद्धतीच्या आकारणीतील त्रुटींवर आक्षेप घेण्यासाठी व नागरिक संघटना व या विषयात रुची असणआऱ्या प्रबुद्ध नागरिकांची सभा शनिवारी दुपारी चार वाजता जनआक्रोशने आयोजित केली आहे.
जनआक्रोशचे कार्यालय सेंट्रल बाजार रोड रामदासपेठेवरील पुष्पकुंज बिल्डिंग, दुसऱ्या मजल्यावर आहे. अधिक माहितीसाठी ९४२२१०५९११ या क्रमांकावर संपर्क साधावा.