मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात असलेल्या पश्चिम क्षेत्रीय उपकरण विज्ञान केंद्राने (डब्लूआरआयसी) सौरऊर्जा क्षेत्रातील नवीन उपकरणे तयार केली आहे. ही तीनही उपकरणे विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षकांसाठी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तसेच औद्योगिक संस्थांसाठी उपयुक्त ठरली असून या उपकरणांचे एकाधिकार (पेटंट) मिळविण्यासाठी डब्लूआरआयसी प्रयत्न करीत आहे.  इंडिग्रेटेड अ‍ॅपरेटर्स फॉर एज्युकेशन ऑफ सोलार सेल (सोलार स्टिम्युलेटर), एलईडी बेस्ड सोलार सेल स्पेक्ट्रल रिस्पॉन्स मीटर आणि ड्रिफ्ट फ्री एलईडी बेस्ड कलरीमीटर अशी या तीन उपकरणांची नावे आहेत. ही उपकरणे आनंद ओक, हेमा शहा, गोविंद चित्ते आणि रमण कुट्टी यांनी आयआयटी मुंबईच्या प्रा. ब्रिजमोहन अरोरा व डब्लूआरआयसीचे संचालक प्रा. अरुण नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहेत.
या तीन उपकरणांपैकी सोलार स्टिम्युलेटर आणि एलईडी बेस्ड सोलार सेल स्पेक्ट्रल रिस्पॉन्स मीटर ही दोन उपकरणे डब्लूआरआयसीने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विकसित केली आहेत. त्याची रचना आणि बांधणी पूर्णपणे डब्लूआरआयसीमध्ये करण्यात आली आहे. यापैकी सोलार स्टिम्युलेटर हे उपकरण आयआयटीच्या ‘टीच थाऊजंड टीचर्स’ या कार्यक्रमांतर्गत झालेल्या फोटो व्होल्टाईक्स या विषयावरील कार्यशाळेत देशभरातील महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर डब्लूआरआयसीने अशी ४० उपकरणे आयआयटीला दिली. ही उपकरणे देशातील ३५ महाविद्यालयांत पाठवण्यात आली. या कार्यशाळेत देण्यात आलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा वापर देशातील फोटोव्होल्टाइक्स तंत्रज्ञानासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी होणार आहे.
तसेच डब्ल्यूआरआयसीने ड्रिफ्ट फ्री एलईडी बेस्ड कलरीमीटर हे उपकरण देशभरातील पदवी व पदव्युत्तर प्रयोगशाळांसाठी तयार केले आहे. हे उपकरण रासायनिक व औषधी उद्योगांनाही उपयुक्त ठरणार आहे. हे उपकरण रासायनिक व औषधी उद्योगांनाही उपयुक्त ठरणार आहे. सध्या बाजारात असलेल्या कलरीमीटरमधील उणीवा दूर करून हे उपकरण बनवण्यात आले असल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai univercity step ahead in solarenergy
First published on: 17-11-2012 at 12:09 IST