काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत ऊर्फ मुन्ना दायमा (वय ६०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रस्त्यावरील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
मुन्ना दायमा हे स्वत: १९७८ पासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राजकारणाचा वारसा स्वातंत्र्यसैनिक असलेल्या स्वत:च्या वडिलांपासून त्यांना मिळाला होता. ते काही वर्षे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. सध्या ते शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळत होते. १९९२ ते ९७ या कालावधीत मुन्ना दायमा हे महापालिकेत नगरसेवक होते. त्यांनी पालिका परिवहन समितीचे सभापतिपदही सांभाळले होते. सोमवारी सकाळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munna dayama passed away
First published on: 28-01-2013 at 08:19 IST