नगराध्यक्षपद निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या अंबरनाथमधील नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून, १५ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी होणार आहे.
५ नोव्हेंबर २०१२ रोजी अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. आघाडीकडे २६ आणि महायुतीकडे २४ असे संख्याबळ असताना आघाडीतील चार नगरसेवक गैरहजर राहिले आणि युतीच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदी निवड झाली.
 गैरहजर राहणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे रवींद्र करंजुले, मनोज देवडे, रजनी तांबे, तर राष्ट्रवादीच्या नासीर कुंजाली या नगरसेवकांचा समावेश               होता.
गैरहजर नगरसेवकांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गटनेते अनुक्रमे अ‍ॅड. यशवंत जोशी व सदाशिव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.