विंचूर येथे १५ एप्रिल रोजी पडलेल्या दरोडय़ातील एका संशयितास पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून सुमारे सात तोळे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या बंगल्यावर रात्रीच्या सुमारास चौघा दरोडेखोरांनी तलवारी, गज यांच्यासह मारहाण करीत सुमारे दहा तोळे सोने लुटून नेले होते. सुमारे अडीच लाखांचा ऐवज या दरोडय़ात लुटण्यात आला होता. पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील वाळवी येथून नितीन चव्हाण (रा. अनकुटे, ता. येवला) या संशयितास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली असून चोरी केलेले सोने विक्री केल्याची माहिती दिली.  पोलिसांनी सोने जप्त केले असून तिघा साथीदारांचा तपास आता लासलगाव पोलीस करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onचोरीRobbery
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One arrest of robbery in vinchur
First published on: 30-07-2013 at 09:26 IST