जिल्ह्य़ातील वडसा ते कुरखेडा मार्गावर  अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक नर बिबट ठार झाला.
जड वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबटय़ाला जोरदार धडक दिली. यात बिबटय़ाच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडसाचे उपवनसंरक्षक आशीर्वाद रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक वाघाये, वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीधर सोनवणे यांनी वडसा पोलीस ठाण्याला घटनेबाबत माहिती दिली. हा बिबटय़ा अंदाजे ३ ते ४ वर्षांचा असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.