scorecardresearch

भाजप कार्यकर्त्यांना व्यक्तिमत्व विकास करण्याचे निर्देश

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कार्यकर्त्यांना व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व कला, समयसूचकता हे गुण अंगीकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कार्यकर्त्यांना व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व कला, समयसूचकता हे गुण अंगीकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून येथे आयोजित केंद्र रचना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेश भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी हेच स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी होते. व्यासपीठावर प्रदेश सचिव सीमा हिरे, माजी महापौर व शहर सरचिटणीस बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दत्ताजी कुलकर्णी, सरचिटणीस विक्रांत चांदवडकर, शहर युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस सुरेशा पाटील, प्रशांत जाधव, सुनील केदार आदी उपस्थित होते. ठाकूर यांनी तरुण वर्ग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टिकोनातून बघत असून जास्तीत जास्त तरुणांना भाजपच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी तरुणांच्या विकासास कारणीभूत ठरणारे विविध उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी गोवा विधानसभा निवडणूक प्रचार काळातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून प्रचार व प्रसार यंत्रणेत प्रत्येक घटक किती मोलाचा असतो हे पटवून दिले.
सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, द्वारका मंडलांच्या केंद्र रचनेचा आढावा या वेळी घेण्यात आला. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास त्यांच्या जागेवर नवीन व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे त्यांनी सूचित केले. या वेळी पालवे यांनी नियोजनाचा आढावा सादर केला. सावजी यांनी प्रदेश युवा कार्यकारिणीची बैठक नाशिकला होत असल्याने संपूर्ण नाशिक भाजपमय करण्याची ग्वाही दिली.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2013 at 07:32 IST

संबंधित बातम्या