कलेवर परिवर्तनवादी विचारांचा पगडा राहिलेला आहे. त्यामुळे कला ही परिवर्तनाचे उद्दिष्ट साध्य करते. कलेच्या माध्यमातून रामकाका मुकदम यांनी बांधिलकी जपली आहे, असे मत डॉ. भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथे कै. रामकाका मुकदम यांच्या स्मृती समारोहानिमित्त ‘रंगयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी अ‍ॅड. रा. स. देशपांडे, चित्रकार दिलीप बडे, अमर हबीब, राजेंद्र पिंपळगावकर आदी उपस्थित होते.
डॉ. कांगो म्हणाले, कलेमध्ये माणूस जोडण्याची शक्ती असते. माणसातले माणूसपणही कला जागवते. रामकाका मुकदम हे कलेबरोबरच चळवळीशी निगडित असलेले व्यक्तिमत्त्व होते. राजकारणातही कलाकारांचे महत्त्व आहे. अलीकडे राजकारणाविषयी वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजाशी नाते असलेला व आपुलकी असलेला माणूस राजकारणात हवा आहे. एकीकडे राजकारणाविषयी घृणा निर्माण होत आहे, तर दुसरीकडे कलेचे सामथ्र्य वाढत असून त्याला प्रतिष्ठा मिळत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले.